चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या गोवरी कोळसा खाण कामगार वसाहती जवळील ओढ्यावर पोहायला गेलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवार, १६ जुलै ला सायंकाळी उघडकीस आली.

Recommended read: सकमुरचा शेतकरी ठरला MSEB च्या निष्काळजीपणाचा बळी

मृत युवकाचे नाव प्रीतम गुरुदास आवारी असून तो वेकोली कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी चार वाजता दुचाकी नाल्याजवळ ठेवून होती. या गाडीवर शर्ट व पँट ठेवून होते. हा युवक पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. प्रीतम गुरुदास आवारी, रा.गोवरी कॉलनी येथील असल्याची माहिती मिळाली. हा युवक पोहायला आला होता आणि बुडून मृत्यु झाल्याचं समजले.

माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआई प्रशांत साखरे व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी प्रीतमचा शोध घेतला, मात्र नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा होत होता.

Recommended read: “त्या” रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदार व ठाणेदार बनले देवदूत

रविवार १७ जुलै ला पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मृतकाचा मागे आई,वडील व तीन बहिणी आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एपीआई प्रशांत साखरे व चमू करीत आहेत.

One thought on “पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यु”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!