motorcycle, car, crash-40000.jpg

दुचाकी अनियंत्रीत झाल्याने घडला अपघात

विसापूर – बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील वेकोलि वसाहतीतून दुचाकीने विसापूर मार्गे बल्लारपूर कडे जात होता. मात्र त्याची दुचाकी अनियंत्रित झाल्याने विसापूर जवळील हनुमान मंदिर जवळच्या पुलाला जबरदस्त धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता नांदगाव ( पोडे )-विसापूर मार्गांवर घडली.अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव हेमंत राजन्ना पत्तीवर ( वय -२७) रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर असे नाव आहे.

Recommended read – पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू

हेमंत पत्तीवर हा तरुण काही कामानिमित्त नांदगाव (पोडे ) येथे गेला.वेकोलि वसाहतीतून तो दुचाकी क्रमांक एम. एच.३४- बी. एक्स.२२८८ ने विसापूर मार्गाने बल्लारपूर कडे जात होता.दरम्यान हेमंत चे दुचाकी वरून नियंत्रण सुटले. त्याने विसापूर जवळील हनुमान मंदिर जवळच्या पुलाला जबरदस्त धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अपघातात गंभीर हेमंत च्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती विसापूर औट पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल व शिवराज वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Recommended readअल्पवयीन मुलीवर अत्याचार

हेमंत पत्तीवर हे वेकोलि बल्लारपूर येथे कार्यरत असून बल्लारपूर च्या वेकोलि च्या वसाहतीत राहत असल्याची माहिती आहे. ज्या दुचाकीने हेमंत चा अपघात झाला. ती दुचाकी नांदगाव (पोडे ) वेकोलि वसाहतीत राहणारे दत्ता वाघमारे यांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेमंत पत्तीवर हे नांदगाव (पोडे )येथे कोणत्या कामासाठी गेले होते. हे मात्र कळू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रास्कर हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!