कोण आहे हा यासिन मलिक?

कोण आहे हा यासिन मलिक Yasin Malik ?

यासिन मलिकचा प्रवास

१९८० : काश्मीरमधील आर्मी आणि टॅक्सीचालक यांच्यातील वादातून यासिन मलिक बंडखोर झाला. ताला पार्टीचं स्थापना केली.

१९८३ : शेर काश्मीर स्टेडियमवरील भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामना उधळवून लावण्याचा प्रयत्न केला.

१९८७ : मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरला. मात्र निवडणुकीत अफरातफर झाल्याचा आरोप करत दहशतवादी कारवाया करण्यास सुरवात केली. काश्मीरमध्ये हिंसाचारात सहभागी.

Recommended read: राज्यातील सर्वात वयोवृद्ध ‘वाघडोह‘ वाघाचा मृत्यू

१९८९ : पाकिस्तानमध्ये दहशतवादी बनण्याचं ट्रेनींग घेऊन आल्यानंतर जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख नेता बनला. याच वर्षी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद कन्या रूबैया सईद यांच्या अपहरणात सहभाग.

१९९० : काश्मिरी पंडितांना काश्मीर मधून हाकलून देण्यात सहभाग. एअरफोर्सच्या ४ जवानांच्या हत्येत देखील सहभागी. या वर्षी अटक करण्यात आली.

१९९४ : जेलमधून सुटका. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटकडून सीझफायरची घोषणा केली.

१९९९ : यासीन मलिकला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (PSA) अटक करण्यात आली.

२००२ : यासीन मलिकला दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आणि त्याला जवळपास एक वर्ष नजरकैदेत ठेवण्यात आले.

२००७ : यासीन मलिकने सफर-ए-आझादी (स्वातंत्र्याचा प्रवास) म्हणून ओळखली जाणारी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत काश्मीरमधील सुमारे ३,५०० शहरे आणि गावांना भेटी देऊन भारतविरोधी भूमिकेचा प्रचार केला.

२००९ : इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी चित्रकार मिशाल मलिक हिच्याशी ४२ व्या वर्षी विवाह केला.

Recommended read: तब्बल १९ तासानंतर बेपत्ता पती गंभीर जखमी व बेशुध्दावस्थेत आढळला जंगलात

२०१३ : पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये यासिन मलिकने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (LeT) प्रमुख हाफिज मुहम्मद सईदसोबत व्यासपीठ शेअर केले.

२०१६ : यासिन मलिकने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र लिहून गिलगिट-बाल्टिस्तानच्या पाकिस्तानमध्ये विलीनीकरणाला विरोध केला.

२०१९ : NIA ने यासिन मलिकला जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी आणि फुटीरतावादी गटांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात अटक केली.

२०२२ : दिल्ली न्यायालयाने यासिन मलिकवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.

१० मे २०२२ : मलिकने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसाठी दोषी ठरवले.

२५ मे २०२२ : यासिन मलिकला जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या विशेष कोर्टानं टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिक ला जन्मठेपेची शिक्षा

2 thoughts on “राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या विशेष कोर्टानं टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिक ला जन्मठेपेची शिक्षा”
  1. […] दोन जहाल नक्षलवादी चे आत्मसमर्पण राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या विशेष… १९ तासानंतर बेपत्ता पती गंभीर जखमी […]

  2. […] दोन जहाल नक्षलवादी चे आत्मसमर्पण राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या विशेष… १९ तासानंतर बेपत्ता पती गंभीर जखमी […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!