राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

चंद्रपूर: आठ वर्षानंतर चंद्रपूर दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर एका आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपनीकडून फसवणूक झालेल्या महिलांनी घोषणा बाजी केली.

कलकाम नामक या कंपनीची मनसेचे स्थानिक पदाधिकारी पाठराखण करीत आहे, असा आरोप या महिलांनी केला. या पिडित महिलांचे निवेदन ठाकरे यांनी स्वीकारले आणि संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिला ठाकरे यांच्या मुक्काम स्थळी अचानक धडकल्याने काही वेळासाठी एकच खळबळ उडाली.

Recommended read: १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा व २० वर्षीय अल्पवयीन बालकाचा बालविवाह रोखण्यात यश

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. काल सोमवारला सायंकाळी ते चंद्रपुरात दाखल झाले. त्यांचे विविध ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. आज मंगळवारला स्थानिक एऩडी हॉटेल येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षवाढी संदर्भात त्यांनी सूचना केल्या. पक्ष माझा आहे. कुणाला पद द्यायचे मी ठरवीन. आपसातील भांडण मिटवा. एकत्र बसून निर्णय घ्या, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान दिलीप रामडेवार, सचिन भोयर, मनदीपभाऊ रोडे आणि राहूल बालमवार या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी बंद द्वार चर्चा केली. त्यानंतर शहरातील डॉक्टर, सीए, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी ठाकरे यांनी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येत मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Recommended read: राज्य सरकारकडून पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा

भाजपच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने ठाकरे यांचा भेट घेतली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ठाकरेंना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिले. त्यासोबत एक राष्ट्रध्वजाचं सन्मानचिन्ह देण्यात आले आहे.

दुसरीकडे या गाठीभेटी सुरु असताना कलकाम कंपनीकडून फसवणूक झालेल्या महिला हॉटेल बाहेर धडकल्या. त्यांनी ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या कंपनीचा पाठराखण करणाऱ्या मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, असे निवेदन त्यांनी ठाकरेंना दिले.

Recommended read: जिवंत विद्युत तारा जिवावर उठल्या

निवदेन स्वीकारल्यानंतर कारवाईचे आश्वासन देत ठाकरे पुन्हा चंद्रपुराला येण्याचे आश्वासन देवून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!