वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू

ब्रम्हपुरी: शेतात निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. हल्ल्यात महिला ठार केल्याची घटना मंगळवार, 27 सप्टेंबरला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आवळगाव शेतशिवारात घडली.

Recommended read: राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत

आवळगाव येथील धृपता श्रावण मोहुर्ले (55) ही महिला नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतावर गेली. शेतात काम करीत असताना मागून आलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले व जंगलातील कक्ष क्रमांक 1138 मध्ये त्यांचा मृतदेह ओढत नेला.

कुटुंबातील व्यक्ती शेतावर गेले असता महिलेच्या चपला आढळून आल्या. यानंतर कुटुंबियांनी गावात माहिती दिली. लगेच आवळगाव येथील वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी शोधमोहीम सुरू केली असता, घटनेच्या दीड तासानंतर महिलेचे प्रेत कक्ष क्रमांक 1138 मध्ये आढळून आले. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मेंडकी पोलिस दाखल झाले.

Recommended read: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपी अटक!

घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. यावेळी दक्षिण वनवृत्ताचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे, वनक्षेत्रसहाय्यक ए. पी. करंडे, वनरक्षक लिलाधर सातपुते तसेच मेंडकी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.

वाघाचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहे. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला असून, तालुक्यात सर्वत्र ग्रामस्थांना भितीने ग्रासले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!