मुल बसस्थानकात १५ दिवसात बसच्या धडकेत दोघांचा बळी

चंद्रपूर: मुल येथील बसस्थानकावर बस चालकाने एका महिलेस बसने जबर धडक दिली. बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. वाहन चालकाचे दुलर्क्ष झाल्याने महिलेला जीव गमवावा लागला आहे.

Recommended read: गळफास घेतलेल्या अवस्थेत तरूणांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सरिता मनोज कर्रेवार रा. मारोडा (२६) असे मृतक महिलेचे नाव आहे. पती मनोज कररेवार यांच्या डोळ्यादेखत अपघात पत्नीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसात बस स्थानकात दोघांचा जीव गेला आहे.सरिता व मनोज कर्रेवार हे दोघे पती पत्नी गडचिरोलीकडे जाण्यासाठी मूल बस्थानकावर बसची वाट बघत उभे होते. एवढ्यात मूल बस्थानकावर उभी असलेली बस चंद्रपूरकडे जाण्यासाठी निघाली असता सदर बस कुठे जाणार आहे याचा फलक बघण्याकरिता सरिता या बससमोर गेल्या. यादरम्यान बस चालकाचे दुलर्क्ष झाल्याने बसने महिलेला जबर धडक दिली.

Recommended read: लाकूड वाहतूक परवाण्यासाठी वनपालाने घेतली १ लाख रूपयाची लाच

सरिता कररेवार यांना तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पतीच्या डोळ्यासमोर पत्नीचा जीव गेल्याची दुर्दैवी घटनेने मारोडा गवात या घटनेने शोककळा पसरली आहे. या घटनेची तक्रार मृतक सरिता कर्रेवार चे पती मनोज कररेवार मूल पोलीसात दिली असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मागील १५ दिवसापूर्वी नादुरूस्त असलेली बस दुरूस्ती करीत असतांना बस अंगावरून गेल्याने तंत्रज्ञ चा मृत्यू झाला होता. मागील पंधरा दिवसात बसच्या धडकेत दोघाचा जीव गेला आहे.

2 thoughts on “बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!