स्त्री ही निसर्गताच सक्षम : अरुंधती कावडकर

जागतिक महिला दिन: गोंडवाना विद्यापीठाकडून कर्तुत्वान महिलांचा सन्मान

चंद्रपूर: जागतिक महिला दिन- प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसतात. त्यामुळे त्यांची ओळख तयार होत असते. महिला या नावातच महि आहे म्हणजे महत्ता आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःचे आत्मपरीक्षण कराला हवे. आपली बलस्थानं कोणती आहे, ते ओळखता आले पाहिजे. स्त्री ही निसर्गतः सक्षम आहे. मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यास, त्या संधी चे त्या सोने करतीलअसे प्रतिपादन सैनिक स्कूल चंद्रपूरच्या प्राचार्या अरुंधती कावडकर यांनी केले.

Recommended read: आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन विशेष व्याख्यान

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार समारंभ गोंडवाना विद्यापीठ सभागृहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मुख्य अतिथी म्हणून प्राचार्य सैनिक स्कूल चंद्रपूर अरुंधती कावडकर, संस्थापक विश्वस्त, आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा, शुभदा ताई देशमुख, विशेष उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल झेड. चिताडे यांची उपस्थिती होती. त्या पुढे म्हणाल्या, धैर्य, सामर्थ्य, शौर्य, ज्ञान, संवाद, विजयकांक्षा, विवेक, सातत्य, जगण्याची दुर्दम्य इच्छा शक्ति, ही आयुधे प्रत्येक स्त्रीत असणे आवश्यक आहे. संस्थापक विश्वस्त आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा शुभदाताई देशमुख म्हणाल्या, शिक्षणाचे मंदिर म्हणून आपण विद्यापीठाकडे पाहतो. विद्यापीठाने जे पाऊल उचलले आहे. ग्रामसंभाना प्रशिक्षण देण्या संदर्भात ते अतिशय स्तुत्य आहे.

Recommended read: विरोधी पक्ष्याच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले , विद्यापीठात ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत आहे. अतिशय मेहनतीने आणि चिकाटीने त्या काम करतात. या महिलांच्या कामाचे प्रतिबिंबही विद्यापीठाच्या प्रगतीत उमटत असते. महिलांसाठी येथे सुरक्षित वातावरण निर्माण झाले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आजचा महिला दिन साजरा केल्याचे केल्याचे सार्थक होईल. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गट ग्रामपंचायत कोटी, ता. भामरागड, जि .गडचिरोली च्या सरपंच भाग्यश्री लेखामी, वनहक्क महाग्रामसभा ता. कोरची, जि.गडचिरोली सहसचिव कुमारीबाई जामकातन, पणती स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवी फर्झाना शेख, ग्रामसभा सदस्य मेंढा (लेखा) ता. धानोरा जि. गडचिरोली नंदा दुग्गा, पोलीस पाटील, दुधमाळा ता. धानोरा जि. गडचिरोली लताताई उईके यांचा सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिन

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!