चारगाव येथील घटना

जिल्हा रुग्णालयात जखमी महिला भरती

चंद्रपूर: शेतात गवत कापत असतानाच वाघाने महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील चारगाव येथे घडली.

महिलेसोबत असलेल्या सासू-सासऱ्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी असलेले मजूर धाऊन आले. मजूर येत असल्याचे पाहून वाघाने जंगलाकडे धूम ठोकली. वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेवर सिंदेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Recommended read: भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी मनपाला लुटले – पप्पू देशमुख यांचा आरोप

सोनाली चेतन मसराम असे महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळावर आली. सोनाली मसराम यांच्या पाठीला, छातीला व पायाला जखमा झाल्या आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती क्षेत्र सहायक हटवार यांनी दिली.

दोन दिवसापूर्वी बैलावर हल्ला

चारगाव (बड़गे) गावाला लागून असलेल्या डोंगरगाव (सा.) येथे दोन दिवसाआधी वाघाने एका बैलाला ठार केले, तर एक बैल गंभीर जखमी केला होता.

Recommended read: चिमुकल्या भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू

डोंगरगाव (सा.) येथील प्रकरण ताजे असताना शेजारी असलेल्या चारगाव (बडगे) येथील महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!