महिला ठार – १० ट्रक पेटवले : परिसरात ताणाव

अमोल घुगुल

गडचिरोली : आलापल्ली-आष्टी मार्गावरील शांतिग्राम गावाजवळ सूरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने १० ट्रक पेटवले.

बीजोली सुभाष जयदार (४५, रा. कांचनपूर) असे मृत महिलेचे नाव असून अपघातात पती सुभाष जयदार थोडक्यात बचावले. यावेळी संतप्त जमावाने ८ ते १० ट्रकला आग लावून पेटवून दिल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.

Recommended read: आवळगावात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल वाहून नेणाऱ्या शेकडो अवजड वाहनांमुळे आलापल्ली-चंद्रपूर मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात.

मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुभाष जयदार पत्नी बीजोलीसह आपल्या दुचाकीने कांचनपूरला जाण्यासाठी निघाले होते. शांतीग्राम जवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात बीजोली यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यासमोर पत्नीचा जीव गेल्याने सुभाष यांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

Recommended read: राज ठाकरेंच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर मनसेत मोठे फेरबदल

दरम्यान, संतप्त जमावाने मार्गावरील १० पेक्षा अधिक अवजड वाहनांना पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी नारिकांमध्ये सूरजागडच्या वाहतुकीविरोधात प्रचंड रोष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

Recommended read: एकाच कुटुंबातील चौघांचा सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न

खराब रस्ते आणि अवजड वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. कित्येकदा मागणी करूनही प्रशासन यावर तोडगा काढत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

By Amol Ghugul

Founder IG Media Chandrapur Sub Editor - Omkar Wandhare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!