आझाद बगीचा चंद्रपूर

पत्रिका व कोनशिलासुद्धा बदलवली, आझाद बगिचा उद्धघाटन मान- अपमान नाट्य

चंद्रपूर: आझाद बगीचा चंद्रपूर च्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून स्थानिक आमदार व खासदार यांना डावलून मनपाने राजशिष्टाचारांचा भंग केला होता. आमदार, खासदार व काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजशिष्टाचार भंगची तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आयुक्तांना नोटीस पाठवून राजशिष्टाचारानुसार कार्यक्रम घ्यावा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावताच मनपा प्रशासनाने माघार घेत सर्व लोकप्रतिनिधींची नावे असलेली नवीन पत्रिका छापली असून कोनशिलासुद्धा बदलविली आहे.

जुनी निमंत्रण पत्रिका

आझाद बगीचा चंद्रपूर ,शहरातील नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून एकमेव बगीचा आहे. या बगीचाची दुरवस्था झाल्यामुळे २०१६ मध्ये या बगीचाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तब्बल सहा वर्षे नूतनीकरणाचे काम चालले. ३० एप्रिलला मनपाची मुदत संपणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बगीचा लोकार्पणाचा सोहळा आटोपण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज २६ मार्चला लोकार्पण सोहळा आयोजित केला.

Recommeneded read: दुकानाची पाटी मराठीत असणे अनिवार्य, अन्यथा कारवाई होणार

लोकार्पण सोहळ्याला राजशिष्टाचारानुसार लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अपेक्षित होते. परंतु, आयोजकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकले नाही. आयोजक म्हणून मनपा प्रशासनाने केलेली चूक गंभीर आहे. त्यामुळे तातडीने ही चूक दुरुस्त करून राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची नावे पत्रिकेत समाविष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानंतर मनपा प्रशासनाने लोकार्पण सोहळ्यावर उठलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

नवीन निमंत्रण पत्रिका

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह अन्य आमदारांच्या नावांचा समावेश असलेली नवीन निमंत्रण पत्रिका तातडीने छापून वितरित केली. तसेच बगीचा परिसरात लावण्यात येणारी कोनशीलासुद्धा बदलविली आहे. त्या कोनशीलेवरही सर्व लोकप्रतिनिधींना राजशिष्टाचारानुसार सन्मान देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!