चंद्रपूर : सततचा कौटुंबिक वाद व पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केली. ही घटना इंडस्ट्रीयल प्रभागात शुक्रवारी सकाळी घडली. अलकराम मनीराम राऊत असे मृताचे नाव आहे.

Recommended read: चिचपल्लीजवळ चारचाकी वाहनाचा भिषण अपघात

मूळचे छत्तीसगड राज्यातील असलेले अलकराम राऊत हे कामाच्या शोधात चंद्रपुरात आले होते. इंडस्ट्रीयल एरिया प्रभागात ते भाड्याने राहत होते. मृत अलकराम याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन आल्यावर घरी पत्नी सूरजाबाई हिला मारहाण करून वाद घालायचा.

अशातच अलकराम हा शुक्रवारी सकाळी दारूच्या नशेत घरी आला असता, संतापलेल्या पत्नी सूरजाबाईने पतीला धक्काबुक्की केली. यात ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. पत्नीकडून पतीची हत्या या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!