जादूटोणा संशयावरून मारहाण : दोघांना अटक

चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील भय्याजी मेश्राम यांच्या पत्नीची अचानक तब्बेत बिघडली. अनेक ठिकाणी उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. एका मांत्रिकाने हा जादूटोणा प्रकार असल्याचे सांगितले.

Recommended read: सावली येथे बोलेरो वाहनाचा भीषण अपघात

कुटुंबातील सर्व सदस्यांचीही तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे जादुटोणा केल्याच्या संशयावरून शेतीकडे जात असलेल्या त्या विधवा महिलेला भैय्याजी आणि त्याचा मुलगा देवानंद मेश्राम याने मारहाण केली. तसेच महिलेच्या पुतण सुनेलासुद्धा मारहाण करण्यात आली. शशिकला प्रकाश बारसागडे (४५) असे मारहाण झालेल्या विधवा महिलेचा नाव आहे. भैय्याजी मेश्राम व देवानंद मेश्राम या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेची शेती वाघेडा शेतशिवारात असल्याने ती महादवाडी येथून वडसीमार्गे वाघेडा येथे पायदळ शेतावर जात होती. तिच्या शेताजवळ वाघेडा येथील भैय्याजी निंबाजी मेश्राम (६५) यांची शेती आहे.

एक वर्षापुर्वी भैय्याजी मेश्राम याच्या पत्नीची अचानक तब्बेत बिघडली. त्यांनी बऱ्याच खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर बरी झाली नाही. त्यामुळे मांत्रिकाकडे दाखविले, त्याने जादूटोणा केल्यामुळे तब्येत बिघडल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नीनंतर सहा ऑगस्टला घरातील सर्व सदस्यांची एकाचवेळी प्रकृती बिघडली. त्यामुळे जादूटोण्याचा संशय आणखी बळावला.

Recommended read: शेतमजूर बैल धूत असताना वाघाचा हल्ला

विधवा महिला नेहमीप्रमाणे वाघेडा येथे शेतावर जाण्यास निघाली असता, भैय्या मेश्राम यांनी तिला जादूटोणा केल्याच्या संशयावरुन मारहाण केली. त्याचा मुगला देवानंदनेसुद्धा शशिकलावर हात उगारला. त्यानंतर देवानंदने शशीकलच्या घरी जावून सून अनिता हिलासुद्धा मारहाण केली.

महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर भैय्याजी आणि देवानंद मेश्राम यांच्यावर भादंवि ३५४ (अ), ३२३, ५०६, ३४ भादंवि सहकलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या बापलेकाला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!