नक्षली गणवेश घालून, बंदुकीचा धाक दाखवून मागितली २५ लाखांची खंडणी

दोन खंडणी बहाद्दरांना अटक, दोघे फरार

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा गणवेश घातलेल्या तीन ते चार बंदुकधारी इसमांनी गुड्डीगुडम येथील व्ही.एम. मतेरे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन २५ लाख रुपये खंडणी जिमेला नाल्यावर आणून देण्याची धमकी दिली. गडचिरोली पोलिसांनी जिमेला नाल्यावर सापळा रचून दाेघांना अटक केली असून दोघे जण फरार झाले आहेत. दोघांकडून धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या ७ बंदुका व हिरव्या रंगाचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.

Recommended read: आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी साधला युक्रेनवरून आलेल्या विद्यार्थी सोबत संवाद

पोलिसांनी जिमेला नाल्यावर सापळा रचून मल्लेश मारय्या आऊलवार रा. राजाराम (खां.) ता. अहेरी जि. गडचिरोली, श्रीकांत सोमा सिडाम रा. चेरपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली या दोघांस अटक केली आहे. या प्रकरणामधील इतर साथीदार फरार झाले आहेत. अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Recommended read: आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गळफास घेवून आत्महत्या

कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

One thought on “नक्षलवाद्यांचा गणवेश घालून, बंदुकीचा धाक दाखवून मागितली २५ लाखांची खंडणी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!