चारगाव धरण: सेल्फी घेण्याच्या नादात गेला तोल

चंद्रपूर: जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक प्रकल्प तुडुंब भरले आहे. तुडूुब भरलेल्या प्रकल्पाला बघण्याकरिता नागरिक गर्दी करीत आहे. चारगाव धरण बघण्यासाठी वरोरा व शेगाव येथील काही युवक गेले होते.

Recommended read: मुलीने केली प्रियकरांच्या मदतीने आईची हत्या

मोबाईलव्दारे सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरूण प्रकल्पाच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक बाब गुरूवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हार्दिक विनायक गुळघाणे (१९) रा. शेगाव तर आयुष चिडे (१९) रा. वरोरा असे वाहून गेलेल्या युवकांची नावे आहेत.

हार्दिक विनायक गुळघाणे, वरोरा येथील आयुष चिडे, श्वेतम चंद्रकुमार जयस्वाल, मयूर विजय पारखी, आश्रय संजू गोळगोडे गेले होते. हे पाच मीत्र चारगाव धरण बघण्यासाठी गेले होते. धरण बघत असताना हार्दिक हा सेल्फी काढत होता. अचानक त्याचा पाय घसरला व तो तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडेने पाण्यात उडी घेतली. मात्र. आयुषही पाण्यात बुडाला.

Recommended read: मनपा आयुक्तांच्या दालनात युवकांचा स्वतःवरच चाकूहल्ला

दोन्ही मित्र पाण्यात बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी वाविण्यासाठी आरडाओरडा केला. स्थानिक नागरिकांनी वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बचाव पथकाला चारगाव येथे पाठविले असून त्यांनी बचाव कार्य सुरू केले असून दोघांचा शोध घेणे सुरू आहे. अधिक तपास शेगाव पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!