चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हत्या
चंद्रपूरातील रामसेतू पुलावर एकाची हत्या
लग्नाच्या वरातीत डीजेवर नाचण्यावरून झाला वाद
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी दोन हत्याकांड उघडकीस आले आहे. चिमूर तालुक्यातील आंबोली येथे ४५ वर्ष महिलेचा हत्या करण्यात आली तर, चंद्रपूरातील रामसेतू पुलावर एका ४८ वषी्रय इसमांची लोखंडी रॉडने हत्या केली आहे. एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.
लग्नाच्या वरातीत डीजेवर नाचतांना वाद झाला. हा वाद मनात ठेवून लग्न आटोपल्यानंतर पाळत ठेवून आरोपींनी एका मुलाला बेदम मारहाण केली. मारहाण करतांना मुलाचे वडील सोडवायला आले असता मारेकऱ्यांनी लोखंडी रॉडने मुलाच्या वडीलाच्या डोक्यावर जोरदार वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहरातील रामसेतू उडाणपूलावर घडली. किशोर नत्थुजी पिंपळकर (४८) रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर (१८) रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलांचे नाव आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१५ जून २०२३ रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताळा मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजे च्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी वरातीतील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केली. घटनेची माहिती ओम च्या वडील किशोर पिंपळकर यांना होताच ते भांडण सोडवायला गेले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर जबर मारहाण केली. यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला. जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.
तर, चिमूर येथून जवळच असलेल्या आंबोली येथील एका इसमाने ४५ वर्ष महिलेचा खून करून मुलाला गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शारदा दयाराम वाघ असे मृतक महिलेचे नाव आहे तर मोहन दयाराम वाघ (२८) असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे.
आंबोली येथील आबादी प्लॉट बस स्थानक परिसरात राहत असलेले विधवा महिला शारदा दयाराम वाघ मुलगा मोहन हे दोघेही आपल्या घरी झोपडी उभारण्यासाठी खड्डे खोदत असताना बाजूनेच राहत असलेले गोपीचंद सम्पत शिवरकर या आरोपीने भांडण सुरू केले. हे भांडण विकोपाला गेल्याने आरोपींने बैलबंडीची उभारी घेऊन शारदा दयाराम वाघ हिच्या डोक्यावर वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता, तोही जखमी झाला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
