नोकरच चोर निघतो तेव्हा.....

चोरीचा बनाव करून नोकराने उडविले पाऊणे दोन लाख रूपये

चंद्रपूर: पैसे दिसले कि, कुणाची नियत बिघडेल सांगता येत नाही. त्यामुळे आजकाल कोणत्याही व्यक्तींवर विश्वास ठेवता येत नाही. असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. चक्क नोकराने दुकानातील रोकड लंपास केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Recommended read: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला

शहरातील सुलभ प्रोविजन या दुकानातून नोकर व्यवसायाची 1 लाख 78 हजार रुपयांची रक्कम घेऊन जात होता. बँकेत जात असतांना त्याला रस्त्यात अडवून चोरट्यांनी रकमेची बॅग लंपास केली. अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गालगत एका गल्लीत ही रक्कम लुटली. नोकराने घडलेला दुकान मालकास सांगितला. त्यानंतर शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, प्राथमिक माहिती आणि सीसीटीव्हीतील पोशाखावरून दुकानातील नोकरावर संशय बळावला.

Recommended read: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द – सचिन राजुरकर

पोलिसांनी रूपेश नामक नोकराला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने साथीदारांची नावे उलगडली. रुपेश लांडगे या नोकराने ताज कुरेशी आणि रितीश वालकोंडावार या दोघांच्या संगनमताने हा कट रचला. पोलिसांनी 3 आरोपींसह रोख रक्कम ताब्यात घेतली. सुलभ प्रोवीजन दुकानातील दिवसभराची रक्कम घेऊन रूपेश नामक नोकर बँकेत जात होता. ही बाब त्यांने आपल्या दोन मित्रांना सांगून रक्कम लुटण्याचा बनाव करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी मोठया शिताफीने दुकानातील नोकरच चोर असल्याचं सिद्ध केले.

पावणेदोन लाख रुपये लंपास करण्याचा नोकरांचा डाव होता. पण, योग्य पद्धतीनं तपास केल्यानं आरोपी त्वरित सापडलेत. या घटनेमुळे विश्वास ठेवायचा कुणावर असा जनसामान्यांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!