गायक सिध्दू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपी गाेळीबारात ठार

पाच तास चालला गोळीबार

एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला उजव्या पायाला लागली गोळी

चंदीगड: गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतील गोळीबार करणाऱ्यांपैकी दोन गुंडांचा आज अमृतसरजवळील भकना गावात पोलिसांशी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या चकमकीत तीन पोलिसही जखमी झाले.

Recommended read: लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल

जगरूपसिंग रूपा प्रथम ठार झाला, तर दुसरा संशयित आरोपी मनप्रीत सिंग उर्फ ​​मन्नू कुस्सा याने सुमारे एक तास गोळीबार सुरू ठेवला होता. पाच तास चाललेल्या गोळीबारात दुपारी ४ च्या सुमारास तोही मारला गेल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Eया क्रॉस फायरमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला उजव्या पायात गोळी लागली.राज्याचे पोलिस प्रमुख गौरव यादव हे देखील अमृतसरपासून २० किमी अंतरावर असलेल्या भकना गावात चकमकीच्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली.पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने ही कारवाई केली आहे.

Recommended read: अमानुषतेचा कळस, त्याच्या पायाला भला मोठा दगड बांधून सोडले नदीत

पोलिसांनी जगरूप रूपाला मृत घोषित करण्याच्या काही मिनिटांपूर्वीच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती. पाकिस्तानच्या सीमेपासून केवळ १० किमी अंतरावर असलेल्या या भागाला पोलिसांनी वेढा दिला होता आणि लोकांना घरातच राहण्यास सांगितले होते. इतर तीन आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!