रोहित्रातील वीजप्रवाहाच्या धक्क्याने बालिकेचा मृत्यू

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू : गावकऱ्यांत रोष

चंद्रपूर : रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) विद्युत पेटी उघडी ठेवल्याने त्यातील वीजप्रवाहाच्या धक्क्यामुळे एका तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना जिवती तालुक्यातील लांबाेरी येथील आदिवासी कोलाम गुड्यावर घडली.

महाविरणच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मुलीला जीव गमवावा लागल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. ललिता भीमराव मडावी, असे मृत मुलीचे नाव आहे.

Recommended read: बसस्थानकात दोन सख्ख्या भांवडांवर जीवघेणा हल्ला

जिवती तालुक्यातील लांबोरी येथील आदिवासी (कोलाम) गुड्यावर भीमराव मडावी यांची मुलगी ललिता खेळत होती. शेजारीच विद्युत पुरवठा करणारी जनित्राची पेटी होती. ही पेटी उघडी होती. ललिता ही खेळता खेळता या विद्युत पेटीकडे गेल्याने तिला विजेचा जाेरदार शॉक लागला. विद्युत झटक्याने ललिताचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे आदिवासी कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे.

Recommended read: साहित्य संमेलन आयोजनासाठी संस्थांना सात लाखाचा निधी उपलब्ध करून देणार- आ. जोरगेवार

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप आदिवासी मुलींचा बळी गेला आहे. दरम्यान गावकऱ्यांनी अभियंता यांना संपर्क केले असता, गावकऱ्यांनी विद्युत पुरवठा पेठीचे संरक्षण कवच काढून ठेवल्याची बतावणी केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चुक मान्य करण्याऐवजी इतरांवर बोट दाखिवत असल्याने गावात महावितरणच्या अधिकाऱ्यांविरूध्द रोष व्यक्त केला जात आहे.

मृतक मुलींला कुटूंबियांना शासकीय मदत महावितरण कडून दिले जाणार असल्याचे उप अभियंत्ता नितेश ढोकणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!