वाहतूक नियंत्रक आत्महत्या: लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत अधिकाऱ्याविषयी तक्रार ?

बल्लारपूर : राजुरा एसटी डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले येथील शिवनगर वार्डातील रहिवासी भगवान अशोक यादव (३२) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडावी आहे.

Recommended read: स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर ला प्राधान्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष म्हणजे, त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये अधिकाऱ्यांची तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे.भगवाव यादव यांची पत्नी राखीनिमित्त माहेरी गेली होती. त्यामुळे घरी एकटाच होता. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी शेजाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी पोलिसांना त्याच्या जवळ एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याविषयी तक्रारीचा मजकूर असल्याची माहिती मिळाली आहे.

Recommended read: अमृत महोत्सव :चंद्रपूरात ७ कोटी रूपयांच्या राष्ट्रध्वजाची विक्री

पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!