विषारी वायूमुळे वेकोलिच्या दोन कामगारांचा मृत्यू

एकाची प्रकृती गंभीर, दोघे सुखरूप

वेकोली धोपटाळा कॉलनीतील घटना

चंद्रपूर: बल्लारपूर एरिया अंतर्गत येत असलेल्या वेकोली धोपटाळा कॉलनी परिसरातील शौचालयाचे गटर साफ करण्यासाठी उतरलेल्या दोघांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. सुभाष खंडारकर, राजू जंजर्ला असे मृतक कामगाराचे नाव असून सुशील कोरडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. शंकर अंदगुला, प्रमोद वाभिटकर यांची प्रकृती स्थिर आहे.

Recommended read: हजारो वर्षाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी “बहुजन फाईल्स” चित्रपट काळाची गरज : ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

वेकोली धोपटाळा कॉलनीतील शौचालयाचे गटर साफ करण्यासाठी सुभाष खंडारकर व राजू जंजर्ला गटर मध्ये उतरले होते. गटर मध्ये उतरतात विषारी वायूमुळे दोघेही बेशुद्ध झाले. गटर मध्ये कोणतीही हालचाल होत नसल्याचे बघून सुशील कोरडे, शंकर अंदगुला, प्रमोद वाभिटकर हे तिघेही गटर मध्ये उतरले. थेटर मधील विषारी वायू व अक्सिजन अभावी तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर उपस्थित कामगारांनी जेसीबीने गटरचे झाकण तोडून पाच ही कामगारांना बाहेर काढण्यात आले. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान सुभाष खंडारकर व राजू जंजर्ला यांचा मृत्यू झाला तर सुशील कोरडे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. शंकर अंदगुला, प्रमोद वाभिटकर यांची प्रकृती स्थिर असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान कामगाराच्या कुटुंबीयांनी नोकरी व नुसकान भरपाई देण्याची मागणी कामगारांनी लावून धरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!