ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पच्या बनावट संकेतस्थळाव्दारे पर्यटकांची फसवणूक

ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांची बनावट संकेतस्थळाविरूध्द पोलिसात तक्रार

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकींगच्या ऑनलाईन संकेतस्थळाचे बनावट संकेतस्थळ तयार करून एका पर्यटकांला लुटल्या गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ताडोबा प्रशासनाने सायबर पोलिसांत धाव घेवून तक्रार नोंदविली असल्याचे ताडोबाचे क्षेत्रसंचालकांनी सांगितले.

Recommended read: वाघाच्या हल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी बुकींग करण्यासाठी एका पर्यटकांने ताडोबाच्या ताडोबा सफारी बुकींग डॉट इन या संकेतस्थळावर जावून बुकींग केली. जुनाेना प्रवेशव्दाराचे बुकींग करीत ऑनलाईन पैसे भुगतान केले. पर्यटकाला ऑनलाईन संकेतस्थळावरून बुकींगचा संदेश जाणे गरजेचे असतांना एका त्रयस्त्र व्यक्तींने सदर पर्यटकांला फोन जुनोना प्रवेशव्दारावरील बुकींग फुल्ल झाल्याचे सांगितले. परत पुन्हा एका व्यक्तींने पर्यटकांला फोन करून मामला प्रवेशव्दारावर बुकींग आहे. येथे बुकींग करा अन्यथा तुम्हाला तुम्हाला तुम्हचे पैसे परत मिळेल असे सांगितले. पर्यटकांने बुकींग रद्द केली. मात्र, त्याला पैसे परत मिळाले नाही.

ऑनलाईन बुकींग असतांना त्रयस्त्र व्यक्तीं फोन करून बुकींग कन्फर्म कसे करतात असा प्रश्न यानिमत्ताने उभा झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती ताडोबाच्या क्षेत्रसंचालक कार्यालयाला होताच क्षेत्रसंचालकांनी सायबर पोलिसांना बनावट संकेतस्थळाव्दारे पर्यटकांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.

Recommended read: तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद

ताडोबाची माय ताडोबा डॉट ओआरजी हे अधिकृत संकेतस्थळ आहे. ट्रॅव्हल एंजन्ट व सफारी बुकींग करून देणारे एंजन्ट यांनी बनावट संकेतस्थळ तयार करून पर्यटकांची फसवणूक केली असून संबंधित आठ बुकींग वेबसाईटवर कारवाई करावी यासाठी पोलिसात तक्रार दिल्याचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

2 thoughts on “ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पच्या बनावट संकेतस्थळाव्दारे पर्यटकांची फसवणूक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!