शेतमजूर ठार : सावली तालुक्यातील घटना

सावली : बैल धूत असताना वाघाने हल्ला करून शेतमजूर ला ठार केल्याची घटना किसाननगर शेतशिवाराजवळील कोंडेखल मायनरजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: मंत्रिमंडळाचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय

भक्तदास श्रीरंग झरकर 44 राहणार हिरापूर असे मृत शेतमजूर चे नाव आहे. भक्तदास अन्य दोन शेतमजुरांसह एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आवत्याची बासी मारण्‍यासाठी गेला होता. काम संपल्यानंतर परत येत असताना कोंडेखल मायनरजवळ बैल धूत होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला फरफटत नेले.

यावेळी त्याच्यासोबतच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने धूम ठोकली. मात्र यावेळेपर्यंत भक्तदासचा मृत्यू झाला होता.

Recommended read: रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघीण ठार

याबाबतची माहिती सावली वनविभागाला तसेच पोलीस स्टेशनला देण्यात आली. दरम्यान वन विभाग व पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!