चंद्रपूर: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आडकू मारोती गेडाम (५२) असे मृतक इसमाचे नाव आहे.

Recommended read: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द – सचिन राजुरकर

तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाल्याने आडकू हा तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेला होता. तेंदूपत्ता संकलन करीत असतांना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने आडकू गेडाम यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सदरची बाब तेंदूपत्ता संकलनासाठी आलेल्या इतर नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली असता, वाघाने जंगलात पळ काढला. घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

One thought on “तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला, हल्ल्यात इसमाचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!