इमारत कोसळली : एक महिला मलब्याखाली दबली

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्ड परिसरात असलेल्या तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील एका गल्लीत 70 वर्षीय जुनी तीन मजली इमारत कोसळली. धक्कादायक घटना शुक्रवारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: अखेर राजुरा – सास्ती रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी

यामध्ये शबाना खान नामक महिला दबल्या गेली आहे. पुंडलिक पाटील नामक व्यक्तीची ही इमारत असून 70 ते 80 वर्ष जुनी तीन मजली इमारत होती. या इमारतीत शबाना खान या एकट्याच राहत होत्या. दरम्यान आज अडीच वाजताच्या सुमारास ही इमारत पत्त्यासारखी कोसळली.

घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जेसीबीच्या साह्याने महिलेला मलबातून बाहेर काढण्याची काम सुरू होते. वृत्तलेस्तोवर महिलेला मलब्यातून बाहेर काढण्यात आले नव्हते.

Recommended read: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर ही पत्नी झाली गर्भवती

चंद्रपूर शहरात अनेक जीर्ण व जुन्या इमारती आहे. मात्र या इमारतीवर चंद्रपूर शहर महानगरपालिका कडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!