ऊर्जानगर मधील बँक ऑफ इंडिया मध्ये चोरी, सुरक्षा रक्षकाची बंदुक चोरीला?

गडचिरोली: देसाईगंज येथील एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. राहुल बकाराम खरकाटे (२८), मुजशिर शब्बीर शेख (३१) व महेंद्रसिंह सूरजसिंह बावरी (४६) अशी अटकेतील चोरट्यांची नावे असून, तिघेही जण देसाईगंज येथील आंबेडकर वॉडांतील रहिवासी आहेत.

Recommanded Read – चंद्रपूरची विद्यार्थिनी संगीत विषयात नागपूर विभागातून प्रथम

१६ ते १७ जूनच्या रात्री या तिघांनी देसाईगंज येथील बँक ऑफ इंडियाची एटीएम मशिन फोडण्याच्या हेतूने सर्वप्रथम एटीएम मशिन असलेल्या खोलीचे काचा फोडल्या. त्यानंतर मशिनही फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु एटीएम मशिनमधून पैसे काढण्यात चोरट्याना अपयश आले. त्यामुळे चोरट्यांन तेथून पळ काढला.

Recommaded Read – पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू

सदर घटना बँकेच्या व्यवस्थापकांच्या लक्षात येताच त्यांनी देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून तिनही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

2 thoughts on “एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक”
  1. […] अनेकांना झाले प्रत्यक्ष दर्शन एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक चंद्रपूरची विद्यार्थिनी संगीत […]

  2. […] झाले वाघाचे प्रत्यक्ष दर्शन एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक चंद्रपूरची विद्यार्थिनी संगीत […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!