चंद्रपूर: बेकायदेशीररित्या चितळाची शिकार करून त्याच्या मांसाची विक्री करणाऱ्या सुब्बई गावातील तिघांना मुद्देमालासह वन कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे राहुल कोडापे, मारोती कळबे, संजय लोखंडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Recommended read: देशी कट्ट्याचा धाक दाखवून वाहनचालकाची लूटमार

राजुरा वनपरिक्षेत्राचे सुमठाणा नियतवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६६ मध्ये एक चितळ मृत अवस्थेत आढळून आले. हे पाहून ट्रॅक्टर राहुल कोडापे, मारोती कळंबे, संजय लोखंडे यांनी दुचाकीने मृत चितळाला घेवून सुब्बई येथील इंदिरानगर येथे नेऊन मांसाची विल्हेवाट लावले व आपापल्या घरी घेऊन गेले. याची गुप्त माहिती वनविभागाला मिळताच राहुल कोडापे याचे घरी धाड टाकली असता चितळाचे मास व हाडे आढळून आले त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करून तपास करून यात सहभागी असलेल्या मारोती कळंबे व संजय लोखंडे यांच्याही घरी झडती घेतली असता चितळाचे मास आढळून आले यावरून या तिघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

2 thoughts on “चितळाची शिकार प्रकरणी तिघांना अटक राजुरा वनपरिक्षेत्रातील घटना”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!