काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर तीन इसमांचा जीवघेणा हल्ला

क्रिकेट खेळतांना झालेल्या बाचाबाची मुळे मारहाण केल्याची युवकांची पोलिसासमोर कबुली, हल्ला राजकीय नसल्याचे स्पष्ट

चंद्रपूर: काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात तीन इसमांनी आझाद गार्डन परिसरात जीवघेणा हल्ला करून क्रिकेट बॅटने मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

क्रिकेट खेळतांना नागरकर व युवकामध्ये झालेल्या बाचाबाची मुळे मारहाण केल्याचे पोलिसासमोर युवकांनी कबुल केले आहे. त्यामुळे नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर हे नेहमीप्रमाणे व्यायाम करून आझाद गार्डन परिसरातील रघुवंशी कॉम्पेलेक्सकडे जात असतांना शासकीय शौचालयाजवळ दुचाकीवरून आलेले तीन हल्लेखाेरांनी नागरकर यांच्या दुचाकीला धडक देत खाली पाडले. त्यानंतर बॅटने अंदाधुंद मारहाण सुरूवात केली. यामध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.

Recommended read: सर्व राजकिय पक्षांनी ओबीसी आरक्षणाकरीता सर्वानुमते आवाज उठवावा -ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

नागरकर यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनेच्या तीन दिवसानंतर तिघांना अटक केली आहे. सानू उर्फ आसिफ अली आशिक अली रा. BMT चौक रयतवारी कॉलरी, राजेश उर्फ आर.के. अर्जुन केवट रा. रयतवारी कॉलरी, सुमित दयाशंकर बहुरिया आनंदनगर महाकाली कॉलरी यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.

राजकीय व्यक्तीला मारहाण झाल्यामुळे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी दखल घेवून पोलिस प्रशासनाला धारेवर धरून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अटक करण्यात आलेल्या युवकांनी क्रिकेट खेळतांना नगरसेवक नंदू व युवकामध्ये बाचाबाची झाली होती. त्याच रागातून मारहाण केल्याचे पोलिसांना सांगितले.

One thought on “नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!