चंद्रपूर: विदर्भ प्रांतातून विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन बैठकीच्या माध्यमातून विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२२ ला न्यू दिल्ली येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्यावतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली व समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांचे उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन १९ जूनला दुपारी १ वाजता श्री. लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालयात येथे करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ. सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे युवा अध्यक्ष सुभाष घाटे, नंदू नागरकर, विजय पिदुरकर, डॉ. सुरेश महाकुलकर, अविनाश पाल, नितीन भटारकर, गणपती मोरे, कामडी सर, दिवसे सर, बांदुरकर सर, नितीन खरवडे, शकील पटेल, गणेश आवारी, रवींद्र टोंगे, पूर्णिमा मेहरकुरे, तुलसीदास भुरसे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरिकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विध्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते.

ओबीसी लढ्यासाठी व न्याय मागण्यांसाठी ७ ऑगस्ट ला तालकटोरा दिल्ली येथील महाअधिवेशनाला देशभरातील ओबीसी बांधवांनी यावे. लोकशाहीत डोकी महत्त्वाची त्यामुळे अधिकाधिक ओबीसींनी अधिवेशनाला यावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी यावेळी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार प्रदर्शन रजनी मोरे यांनी केले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येत ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!