मध्यरात्री घरात घुसून केली युवकाची हत्या

चंद्रपूर: येथील विश्वकर्मा चौकात मनोज रासेकर (४४) या युवकाची हत्या मध्यरात्री उशिरा घरातच करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

Recommended read: चंद्रपूरात शिवसेनेचे रामदास कदम याचा प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असलेले रासेकर प्रकृती ठिक नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर ते घरीच होते. अशातच बुधवारी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरी मिळाला.

विशेष म्हणजे पत्नी, आई, मुल सर्वजण घरी होते. त्याच वेळी चोरीच्या उद्देशाने काही जण घरात शिरले. त्यांनी गळा दाबून रासेकर यांची हत्या केली. त्यानंतर ते घरातून फरार झाले.

Recommended read: लम्पी स्कीन डिसीज ने चंद्रपूर जिल्ह्यातील ८ गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक थुल करित आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!