खासदार बाळू धानोरकर यांचा बंगला चोरट्यांनी फोडला

तीन सराईत चोरट्यांना अटक

चंद्रपूर : सहकार नगरातील खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांचा सूर्यकिरण नावाचा बंगला चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी घरातील कपाट, अलमारी व लॉकर फोडले, सामानांची नासधूस केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीची आहे.

Recommended read: शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

याच बंगल्यात त्यांचे कार्यालय व निवासस्थान आहे. आता कार्यालय जिल्हा क्रीडांगण परिसरातील नवीन बंगल्यात हलवले. मात्र निवासासाठी खासदार धानोरकर याच बंगल्याचा वापर करतात. मंगळवारला ते दिवसभर येथेच होते. त्यानंतर रात्री वरोऱ्याला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता त्यांना चौकीदारांने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि बंगला फोडल्याची माहिती दिली. रात्रीच्या सुमाराला चोरट्यांनी बंगाल्याचे मुख्यद्वाराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला. त्यांना बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी सामानाची नासधूस केली. याची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत केली.

Recommended read: बंदुकीव्दारे खुनाच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांस अटक

त्याच रात्री सरकारनगर परिसरात आणखी दोन घरफोड्या झाल्या होत्या. खासदार बाळू धानोरकर यांचा बंगला चोरट्यांनी फोडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यांनी बंगाल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तिघे कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. पोलिसांनी चोवीस तासांच्या आता या तिघांना अटक केली. रोहित इमलकर (२४, रा. दुर्गापूर), शंकर नेवारे (२०, रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (२०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

Recommended read: गोडवांना विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील खून, चोरींच्या घटना वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बंगाल लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यामुळे सरकारनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होता. त्यांनी खासदार येतात कधी. मुक्कामी कधी असतात, याची खडानखडा माहिती होती. त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगाल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट केले. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

विशेष म्हणजे, सरकारनगर हा अतिशय शांतताप्रिय परिसर आहे. या परिसरात रात्रीच्या सुमारास शांतता असते. नेमका त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी खासदाराच्याच घरात चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

2 thoughts on “खासदार बाळू धानोरकर यांचा बंगला चोरट्यांनी फोडला”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!