ऊर्जानगर मधील बँक ऑफ इंडिया मध्ये चोरी, सुरक्षा रक्षकाची बंदुक चोरीला?

चंद्रपूर: कडेकोट बंदोबस्त असलेल्या चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील ऊर्जानगर मधील बँक ऑफ इंडिया मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र सायरण वाजल्याने चोरांनी पळ काढला. सुरक्षा रक्षकाने बँकेत ठेवलेली बंदूक गायब आहे. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

Recommended read: धक्कादायक: शिक्षकांचा सात विद्यार्थिनींवर अत्याचार

चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या प्रत्येक गेटवर कडेकोट बंदोबस्त आहे. येथे सी.आय.एस.एफ., वीज केंद्राचे सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा व्यवस्था, महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स यांचा चोवीस हि तास पहारा आहे. चोरटे या सुरक्षा व्यवस्थेला भेदून ऊर्जानगर वसाहतीत शिरले. बँक ऑफ इंडिया बँकेचा दाराला लावून असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सीसीटीव्ही कॅमेरा व कम्प्युटर ची वायरिंग तोडली. त्यानंतर कॅश रूम चे कुलूप तोडन्या करीता गेले असता सायरन वाजले. चोरटे लगेच तिथून पसार झाले. त्यामुळे बँकेतील मोठी चोरी टळली.

बँकेत सुरक्षा रक्षकाने ठेवलेली बंदूक गायब असल्याचे बोलले जात आहे. मात्र सुरक्षारक्षकाने बंदूक बँकेत का ठेवली? हा यक्षप्रश्न आहे. घटनास्थळी एक हातोडी मिळाली आहे. सदर घटना शुक्रवार ते रविवारच्या रात्री ची आहे. शुक्रवार रात्री पासून रविवार पर्यंत बँकेला सुट्टी होती. यादरम्यान हा चोरीचा प्रयत्न झाला आहे.

सोमवारी सकाळी बँकेचे कर्मचारी बँकेत आले असता ही घटना निदर्शनास आली. याबाबत दुर्गापुर ठाण्यात तक्रार नोंदविल्या गेली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. दुर्गापूर ठाण्याचे ठाणेदार स्वप्निल धुळे याबाबत कसून तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!