घटनेमुळे चंद्रपूर महानगर पालिकेत खळबळ

चंद्रपूर : महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात घुसून एका युवकाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली.

Recommended read: क्रिकेट बुकीचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

लक्ष्मण पवार असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहिते यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला. शहरातील समस्या घेऊन शिष्टमंडळ, नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी येतात. अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात. मात्र, आजपर्यंत असा प्रकार झाला नव्हता.

Recommended read: राजुराच्या वाहतूक नियंत्रकाची बल्लारपुरात आत्महत्या

दुपारी आपल्या कक्षात आयुक्त असताना पवारांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली. थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला. आत आयुक्त आणि पवार दोघेच होते. अचानक आयुक्तांनी भेदरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षा रक्षकाने त्वरित आत प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!