ज्युबली शाळा परिसरातील जुन्या वसतीगृहाच्या छतावर मिळाला मृतदेह
तीन आरोपींना अटक


चंद्रपूर: ज्युबली शाळेच्या परिसरातील जुन्या वसतीगृहाच्या छतावर एका ३० वर्षीय युवकाला दारू पाजल्यानंतर त्याचा डोक्यावर बियरची बॉटर फोडून, गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाला सेलो टेप पट्टीने बांधण्यात आले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासातच या खूनातील मुख्य आरोपी वैभव राजेश डोंगरे, संदिप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार, कार्तीक रमेश बावणे या तीघांना अटक केली आहे.


मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ज्युबली शाळा परिसरात जुन्या वसतीगृहाच्या छतावर दारू पिण्यासाठी गेले असता, त्यांना सेलो टेप पट्टी बांधलेला मृतदेह आढळून आला. त्याने लगेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाचा पंचनामा करून तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी मृतक राहुल विलास ठक हा राजुरा येथील असून रहिवासी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. मृतक हा डॉ. चिल्लरवार यांच्या रूग्णालयात रूग्णवाहिका चालक म्हणून कामाला हाेता. एक वर्षापूर्वी मृतकाने एका महिलेच्या मोबाईलवर संदेश पाठविल्याने दोन इसमांनी त्याला मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता, महिलेचा मुलगा वैभव राजेश डोंगरे नाशिक येथे कामाला असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी वैभव हा चार दिवसापूर्वी चंद्रपूरात आल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याला एका साथीदारास पळून जात असतांना अटक केली. आरोपी वैभव राजेश डोंगरे यांने जुन्या वादातून संदिप उर्फ गुड्डू राजकुमार बर्लेवार, कार्तीक रमेश बावणे या दोन मित्रांना हाताशी घेत मृतकाला दारू पाजल्यानंतर गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह चिकटपट्टीने बांधल्याची कबुली दिली आहे. सदरचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, संदीप कापडे यांच्या पथकाने केली आहे.

“त्या” युवकाचा खून जुन्या वादातूनच

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!