एकाला अटक, एक जण पसार

चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथे शिक्षण घेत असलेल्या व दहा महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीचा सांगाळा सदृश्य मृतदेह गुरुवारी हरदोली वैनगंगा नदी काठावरील पडक्या वापर नसलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या युवतीची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचे परिसरात बोलले आहे.

Recommended Read – ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार, अनेकांना झाले वाघाचे प्रत्यक्ष दर्शन

या प्रकरणी पोलिसांनी तरुण राजू बुच्चेवार (रा. वडसा) यास अटक केली असून, मुख्य आरोपी संदीप पटले (२५) रा. हनुमान वॉर्ड, देसाईगंज हा फरार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा येथील एक युवती ब्रम्हपुरी येथे बसस्थानक परिसरात भाड्याच्या खोलीत राहून फार्मसीचे शिक्षण घेत होती.

Recommended Readएटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

मागील वर्षी २०२१ मध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. तेव्हापासून पोलिस तिचा शोध घेत होते. अखेर बेपत्ता झालेल्या युवतीच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन तपासले असता वडसा दाखवित असल्याने पोलिसांनी वडसा येथे लक्ष केंद्रीत केले. संदीप पटले या युवका पोलिसांना त्याचा शोध सुरू केला.

Recommended Readचंद्रपूरची विद्यार्थिनी संगीत विषयात नागपूर विभागातून प्रथम

तपासादरम्यान या प्रकरणात पटले याच्यासोबत असलेल्या त्याचा साथीदार तरुण बुच्चेवार यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्या युवतीची हत्या करून तिचा मृतदेह तालुक्यातील मौजे हरदोली येथे ब्रम्हपुरी-वडसा मार्गालगत वैनगंगा नदी काठावरील एका पडक्या वापर नसलेल्या पाण्याच्या टाकीत टाकल्याचे बुच्चेवार याने सांगितले. यावरून पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळ गाठून त्या टाकीतील पाणी पंप लावून काढले व कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा सद़ृश्य मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ३०२, ॲट्रासिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Recommended Readपडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात, गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकांचा मृत्यू

तरुण बुच्चेवार यास अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी संदीप पटले हा फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. मृतक युवती लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिचा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. घटनेचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी मल्लीकार्जून इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.

One thought on “दहा महिण्यांपासून बेपत्ता असलेल्या युवतींचा सांगाळा मिळाल्याने खळबळ, प्रेम प्रकरणातून खून केल्याची परिसरात चर्चा”
  1. […] समाजमन सुन्न करणारी घटना उघडकीस दहा महिण्यांपासून बेपत्ता असलेल्या… ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!