ओबीसी च्या संविधानिक न्याय मागण्यासाठी ७ मार्चला चक्का जाम आंदोलन

चंद्रपुर :“द काश्मीर फाईल्स” चित्रपटात उच्चवर्णियावर काश्मिरी पंडीत, व ईतर यांच्यावर अत्याचार दाखवुन युवकांची माथी भडकविण्याचे काम करून दोन धर्मात धार्मिक सलोखा निर्माण करण्यापेक्षा आगीत तेल ओतण्याचे काम समर्थनीय नाही. मात्र हजारो वर्षे करोडो शूद्र व अतिशुद्र जातींना उच्चवर्णियांनी जी अमानुष वागणूक दिली त्याची नविन पिढीला जाणिव करन्यासाठी ” बहुजन फाइल्स ” सारख्या सिनेमाची आज नितांत गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणतात की, विसाव्या शतकात मनूस्मृती सारख्या ग्रंथांची होळी करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजावरील अन्यायाला वाचा फोडली होती. हे सत्य कधीही बहुजन समाज विसरनार नाही. उच्च वर्णियांच्या अनेक अमानुष प्रथा इंग्रजांच्या काळात कायदे करुन नष्ट केले असले तरी उच्च वर्णियांच्या प्रथा आजही बहुजन समाजावर अन्याय करीत असल्याचे दिसून येते. लाखो पंडीत काश्मिरमधे मृत्युमुखी पडले, फक्त त्याचाच गवगवा करन्याचे कार्य ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने केला जात आहे. मात्र करोडो बहुजन व हरीजन समाजावर अन्याय व अत्याचार करणा-या उच्च वर्णियांप्रती आवाज उठविण्यासाठी ‘द बहुजन फाइल्स’ सारख्या चित्रपट बनविण्याची नितांत गरज आहे.

Recommended reads: ” त्या” तरूणीचा अत्याचार करून खून, सूरज ठाकरे व मृतक तरुणीच्या नातेवाईकांचा पत्रपरिषदेत आरोप

मंडल च्या विरुद्ध कमंडल आंदोलन करून बहुजन युवकांचे माथे फिरविण्याचे काम करून बहूजन वर्गाला मिळणाऱ्या आरक्षणाला “रथयात्रा काढून” बगल दिली त्या धुसमटलेल्या आगीत बहुजन युवकांची पिढी बरबाद झाली. उच्चवर्णीय युवकांची पिढी बर्बाद झाली काय ?

हजारो वर्षांपासून उच्चवर्णिय समाज बहुजन समाजाच्या कष्टाच्या, श्रमाच्या भरोष्यावर पंचतारांकित जीवन उपभोगीत आहे. त्या बहुजन समाजाला साधे शिक्षण घेण्याचे तरी दरवाजे उघडे होते काय ?

आपली बहूजन समाजावर कायमस्वरूपी पकड निर्माण करण्यासाठी नानातर्हेचे तेहतीस कोटी देव निर्माण करून बहुजन समाजाच्या मानगुटीवर बसवून बहुजन समाजाला कायमस्वरूपी मानसिक गुलाम करून, मंदिराचे पुजारी बनून आजतागायत मलाई खात असणारा उच्चवर्णिय समाज कोणत्या दृष्टीने अत्याचार सहन करीत आहेत.

Recommended reads: धावत्या कारची विद्युत खांबाला धडक, युवकाचा जागीच मृत्यू, कार जळून खाक

कोणत्याही आंदोलनात बहूजन समाज पुढे असतो. पोलिसांच्या गोळीबारात जीव जातो तो बहुजन युवकांचा, आंदोलनाच्या केसेस मध्ये जीवन भरडले जाते बहुजन युवकांचे मात्र नाव होते उच्चवर्णिय समाजाचे.

बहुसंख्याक असणारा ओबीसी समाज अजूनही उच्चवर्णियांनी रचलेल्या हजारो वर्षांच्या रूढी-परंपरेच्या चक्रवृहात लोटांगण घालत असल्यामुळे, जरीही केंद्र सरकार ओबीसी समाजाला सुप्रीम कोर्टाने ओबीसींचा इम्पेरिकल डाटा मागितला असता तो दोषपूर्ण असल्याचे नाटक करीत आहे, यापेक्षा आणखी दुसरा अत्याचार-अन्याय बहुजन समाजावर आजच्या घडीला उच्चवर्णियांचा कोणता असेल ?

बहुजन युवक तडफडुन तडफडुन आपल्या हाताखाली कायमस्वरूपी गुलाम राहिले पाहिजेत ही पूर्वनियोजित खेळी उच्चवर्णिय प्रणित भाजप सरकारची आहे.

काश्मिरी पंडीतांचा आणि हिंदु धर्माचा दुरानव्ययेही संबध नाही. मग पंडीत लोक हिंदू युवकांची माथी भडकविण्याचे काम का करतात?, याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे ?

पंडीतांचा धर्म वेगळा आणि हिंदू धर्म वेगळा असे असतांना पंडीत लोक हिंदू खतरे में का म्हणतात ? पंडीत खतरेमे असे का म्हणत नाहीत ? हिंदू धर्मातिल जनतेची माथी भडकविण्याचा पंडीतांना अधिकार काय ? हिंदूंची धार्मिक माथी भडकावून अल्पसंख्याकांना हिंदूंच्या हातून पराभव करून, तेहत्तीस कोटी देव हिंदूनां दान देऊन पंडीतराष्ट्र निर्माण करण्याची संघाची नीती आहे हे समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

Recommended reads: दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश

कट्टर पंडीतांनी अल्पसंख्याक मुस्लिम धर्माविरुद्ध “द काश्मीर फाईल्स” या नावांने एक फिल्म तयार करून हिंदू धर्मीयांची माथी भडकविण्याचे काम “द काश्मीर फाईल्स” या सिनेमातुन गुजरात निवडणूक लक्षात घेता केल्याचे दिसून येते.

“पंडीत लोक वगळता सर्व जाती धर्माची बहुजन फाईल्स ” अशी जर का फिल्म काढली तर मुस्लिम अतिरेक्यांपेक्षाही किती जहाल अत्याचार पंडीतांनी व उच्चवर्णियांनी या देशातील, बहुजन हिंदू, दलित, आदिवासी, भटके, मागासवर्गीय यांच्यावर केले, ते दिसून येईल. साडेचार ते साडेपाच हजार वर्षे केवळ “मनुस्मृती” च्या आधारे किती नंगानाच केला हे या सिनेमातुन दाखवून प्रबोधन करा. हजारो वर्षे “मनुस्मृती”च्या आधारे कशा प्रकारे सर्व साधनसंपत्ती पासून बहुजनांना वंचित ठेवल्या गेले, बरबाद केल्या गेले, हे जनतेला कळू द्या.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यभिषेकाला पुण्यातील पंडीतांनी विरोध केला हे आम्हा बहुजन समाजाला अजूनही लक्षात येत नाही हे आमचे दुर्दैव. तसेच महात्मा जोतिबा फुले यांना मारण्यासाठी उच्चवर्णियांनी मारेकरी पाठविले, तरीही आम्ही उच्चवर्णियांचा उदोउदो का करायचा ? हेच ते हिंदूद्रोही पंडीत होय. माता सावित्रीबाई फुले यांना शाळेत शिकविण्यासाठी जात असताना शेण, दगड, मारणारे हेच ते हिंदुद्रोही पंडीत होय.

मुसलमान राजाला बहुजन समाज कधीही मुजरा करीत नव्हता, पण हिंदू खतरे में है म्हणणारे उच्चवर्णिय मुजरा करीत होते. अश्या अवसरवादी उच्चवर्णियांना त्यांची जागा दाखवायची खरी वेळ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यास विरोध करणारे उच्चवर्णिय देशभक्त कसे ?

असे एक ना अनेक प्रश्न आहेत. यावर सुध्दा विचार होणे गरजेचे आहे. केवळ मुस्लिम व्देष करुन चालणार नाही तर आजच्या जिवंत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे.

Recommended reads: CDCC बॅंकेतील आर्थीक घोटाळयांची सखोल चौकशी करावी – भाजपाची मागणी

आज बाँलीवूडमध्ये बहुतेक मुस्लिम हिरोंच्या पत्नी या “उच्चवर्णिय” आहेत. मग अशा फिल्म काढून डायरेक्टरला काय साध्य करायचे आहे ?

सतत हिंदू-मुस्लिम वाद, हिंदू ब्राह्मणांचा धर्मावर आधारित असलेला जातीयवाद यामूळे देशाचे अपरिमित असे भरुन न निघणारे नुकसान होत आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये फक्त आणि फक्त बहुजन, दलित, आदिवासी, भटके, मागासवर्गीय जातीचेच मुले मारली जातात, हे सत्य आहे.

आतापर्यंत हिंदू-मुस्लिम दंगलीत पंडीत व उच्चवर्णियांची मुले का मारली गेली नाहीत? हा एक संशोधनाचा विषय आहे.
मुस्लिम हे वाईटच आहेत, अशीच जर धारणा असेल तर उच्चवर्णियांच्या मुली मुस्लिम मुलांशी लग्न का करत आहेत? उच्चवर्णियांच्या मुली बहुजन, मागासवर्गीय, दलित, भटके, आदिवासी या मुलांशी का लग्न करीत नाहीत ? हे तर सर्व हिंदू आहेत.
अशी फिल्म बनवायला हवी की, ज्यातून बहुजनांवरील अत्याचार उघडकिस येवून तसेच भारतातील समाजाला आज भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, आरक्षण, कृषी यावर चर्चा होवु शकेल आणि त्यातून सर्वांचा विकास साधला जावु शकेल आणि सुजलाम-सुफलाम भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल, असे विचार ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी मांडले.

One thought on “हजारो वर्षाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी “बहुजन फाईल्स” चित्रपट काळाची गरज : ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!