१९ तासानंतर बेपत्ता पती गंभीर जखमी बेशुध्दावस्थेत जंगलात मिळाला

चिमूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती

मृत्यु आला होता, मात्र नशिबाने जीव वाचविला

चंद्रपूर : मंगळवारी सकाळी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चिमूर तालुक्यातील केवाडा येथील एका दांपत्यावर वाघाने प्राणघातक हल्ला करून पत्नीला ठार केल्यानंतर बेपत्ता पती आज बुधवारी सकाळी (25 मे ) ला घटनास्थळापासून दीड किमी अंतरावरील डोंगराळ परिसरात बेशुध्दावस्थेत गंभीर जखमी अवस्थेत आढळुन आला. त्याला उपचारार्थ चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. काल वाघाच्या हल्यात पत्नी ठार झाली होती.

Recommended read: चंद्रपुरात युवकाचा निर्घृण हत्या

केवाडा येथील मिना विकास जांभूळकर (वय 45 ) व विकास जांभूळकर जंगलात तेंदू तोडण्यासाठी गेले होते. वाघाच्या हल्ल्यात पत्नी मृत पावली. पती बेपत्ता झाला. मात्र पती विकास आज सकाळी 19 तासानंतर अन्न पाण्याविणा जिवंत आढळून आला आहे. आहे.चिमूर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभूळकर हे पत्नी मिना यांचेसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावापासून एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक 34 मध्ये काल मंगळवारी सकाळी गेले होते. सोबतीला काही लोकही गेले होते. जंगलात गेल्यानंतर सगळे लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी विखूरल्या गेले. जांभूळकर दाम्पत्य एकमेकासोबत राहून पाने तोडत होते. शिवाय पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने ते एकमेकासोबत राहत होते.

दरम्यान याच जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने या दाम्पत्यावर हल्ला केल्याने पती पत्नी यांचि मृत्यू झाल्याचा संशय बांधण्यात आला होता. पती-पत्नी दोघेही साडेदहा वाजेपर्यंत तेंदूपत्ता तोडून घरी यायचे. परंतु काल साडे अकरा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे काही लोकांना सोबतीला घेऊन केवाडा कक्ष क्र . ३४ जंगल गाठून शोधाशोध केली असता पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. तर घटनास्थळापासून 50 मिटरवर पतीचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

Recommended read: त्याच्यासाठी पोटाची भूकच ठरली कर्दनकाळ

त्यामुळे पत्नी पाठोपाठ पतीही वाघाच्या हल्ल्यात ठार झिल्याचा संशय बळावला होता.पती बेपत्ता असल्यामुळे वनविभाग व पिआरटी चमू व काही नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविढ्यात आली परंतु पतीचा शोध सायंकाळ पर्यंत लागला नाही. अखेर सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने शोधमोहीम थांबवून पत्नीला मृतदेह चिमूर उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्याता आला होता.

Recommended read: प्रेम प्रकरणातून प्रेयसीवर चाकू हल्ला

आजबुधवारी पुन्हा शनेरी वनविभागाचे क्षेत्रसहायक रासेकर, वनरक्षक नागरे , पिआरटी चमू व स्थानिक नागरिकांनी लाठ्याकाठ्या घेऊन के़वाडा जंगलात कक्ष क्रमांक 34 मध्ये सकाळपासून शोधमोहीम राबविली. काल घडलेल्या घटनास्थळापासून तब्बल दिड किमी अंतरावर डोंगराळ परिसरात पिआरटी चमूचे विनोद चौधरी व सतीश बावणे यांना डोक्याला गंभीर जखमी बेशूध्दावस्थेत आढळून आला. लगेच वनविभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली. डोक्याला गंभीर जखम, बेशुध्दावस्थेत पडून असलेल्या स्थितीतून उठविण्यात आले. पाणी पाणी म्हणून शब्द काढला. आणि तो जिवंत असल्याचे लक्षात आले. घाटनास्थळी एकच गर्दी झाली. लगेच त्याला पाणी देण्यात आले. तो बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. घाबललेला आणी फक्त रडत होता. नागरिकांनी त्या डोंगराळ परिसरातून त्याला उचलून गावालगत आणले. डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने शरीर रक्तबंबाळ झालेला होता.

काल मंगळवारच्या घटनेपासून आज बुधवारपर्यंत तब्बल 19 घंटे तो बेपत्ता होता. पत्नीपाठोपाठ त्याचाही जीव गेल्याचा संशय सर्वत्र बांधल्याजात असताना नशीब बलवत्तर पती विकास जांभूळकर गंभीर जखमी अवस्थेत जिवंत आढळून आला. मात्र पत्नी हिला जीव गमवावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!