पत्नीला पळवून नेल्याच्या रागात पतीने युवकाचा वडीलांचा केली निघृण हत्या

अंत्यसंस्कारास युवक आल्यास त्यालाही संपविण्याचा होता डाव

चंद्रपूर: घराजवळ राहणाऱ्या अविवाहित युवकाने शेजारी राहणाऱ्या विवाहितेस पळवून नेले. ते दोघेही गाव सोडून एकत्रित राहू लागले. पत्नीला पळवून नेल्यामुळे निराश झालेल्या पतीने पळवून नेणाऱ्या युवकाच्या वडिलांची निघृण हत्या केली.

अंत्यसंस्कारासाठी मुलगा येणार, तेव्हा त्यालाही ठार करू, असा आरोपी पतीचा मनसुबा होता. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले. २२ जुलैला उघडकीस आलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Recommended read: चंद्रपूर जिल्ह्यातील 2 हजार 600 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

नागलोन शेतशिवारात कोराडी नाल्यानजीक २१ जुलैला एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर जखम असल्याने पोलिसांनी प्रारंभीच सतर्कतेने तपास सुरू केला. मृतकाजवळ कुठलेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. परंतु पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली.

रामभाऊ ज्ञानेश्वर पाटील (५०) रा. आंबेडकर वार्ड माजरी असे मृतकाचे नाव असल्याचे त्यांचा मुलगा सिकंदर याने सांगितले. घराशेजारी राहणारा पिंटू पेटकर याच्या पत्नीशी सिकंदर याचे प्रेमसंबंध होते. तो तिला घेऊन गेला व दुसऱ्या गावात राहू लागला. त्यामुळे पिंटू पेटकर नेहमीच चिडून मृतकाच्या घरी जाऊन नेहमी धमक्या देत होता, अशी माहिती सिकंदरने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ पिंटू पेटकरला ताब्यात घेतले आहे.

Recommended read: चंद्रपूरात कोरोना ने दोघांचा मृत्यू

अशी केली निघृण हत्या

आरोपी पिंटू पेटकरला विचारपूस केली असता त्याने घटनाक्रम सांगितला. मृतक रामभाऊ पाटील हा पुरामुळे घरात पाणी असल्याने महावीर शाळेमध्ये इतर नागरिकांसोबत थांबला होता. त्याला पिंटू पेटकर याने चारचाकी वाहनात बसवून कोराडी नाल्याजवळ नेले व त्याच्या शस्त्राने डोक्याच्या खाली मारहाण केली. त्यात रामभाऊचा मृत्यू झाला.

त्याच्या अंतिम संस्कारासाठी त्याचा मुलगा सिकंदर येईल व त्याचाही काटा काढू, या विचारात असताना पोलिसांनी तत्काळ पिंटू पेटकरला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणात पिंटू पेटकरला सहकार्य करणारा एक आरोपी फरार आहे, तर एक अल्पवयीन असून त्यालाही ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!