ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र - विजय वडेट्टीवार

मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार विधानपरिषदेत

मुंबई : जानेवारी 2022 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नागपूर जिल्ह्यातील 6045.69 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व फळबागांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक असून विहित निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी या तालुक्यात सुमारे 76 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतपिक व फळबागाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी, याबाबत विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.

Recommended read: विरोधी पक्ष्याच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान धक्कादायक

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जानेवारी 2022 मध्ये राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना कळविले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकषानुसार तातडीने मदत केली जाईल. तसेच राज्यातील अवकाळी पावसामुळे रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून विशेष अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. या लक्षवेधीमध्ये सदस्य प्रविण दटके यांनी सहभाग घेतला.

One thought on “नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक- मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार”
  1. […] व गर्भपात केंद्राची झाडाझडती नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शे… नार पार खोऱ्यातील पाणी गुजरात […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!