टोमणे मारायची म्हणून मुलीने केली आईची हत्या

टोमणे मारायची म्हणून मुलीने केली आईची हत्या

प्रियकराच्या मदतीने झोपेतच अवळला गळा .

गडचिरोली : लहानपणापासून आई चांगली वागत नव्हती, वारंवार टोमणे मारायची याचा राग मनात धरून एकुलत्या एक २२ वर्षीय मुलीने आपल्या जन्मदात्या आईचीच प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहेरी शहरात उघडकीस आली आहे.

Recommended read: मनपा आयुक्तांच्या दालनात युवकांचा स्वतःवरच चाकूहल्ला

निर्मला चंद्रकांत आत्राम (४९) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी मुलगी उर्मिला आत्राम (२२) आणि रुपेश येनगंधलवार (२२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी उर्मिला ही एकुलती एक होती. वडील चंद्रकांत आत्राम हे पोलिस विभागात कार्यरत होते. त्यांची वीस वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी हत्या केली. तेव्हापासून मृतक निर्मला आपल्या मुलीसह राहायची.

मात्र, अधूनमधून ऊर्मिलाचे आईसोबत खटके उडायचे. तो राग मनात धरून उर्मिलाने प्रियकर रुपेशला आईची हत्या करण्यासाठी तयार केले व ठरल्याप्रमाणे रात्री आई झोपेत असताना तिचा गळा आवळला. मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोघेही घराबाहेर पडले. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने विचारपूस केली असता ही घटना पुढे आली.

Recommended read: क्रिकेट बुकीचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

विशेष म्हणजे काही दिवसांनी आरोपी उर्मिलाला अनुकंपातत्वावर नोकरी देखील लागणार होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अहेरी पोलिस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!