" त्या" तरूणीचा मृत्यू अपघातातच- पडोली पोलिस

पडोली पोलिसांचा मोठा खुलासा, वाहनचालकास अटक


चंद्रपूर: शहरालगतच्या चोराळा गावालगत मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणा पडोली पोलिसांनी मोठा खुलासा केल्याचा दावा केला आहे. चारचाकी वाहनाच्या धडकेत तरूणीचा मृत्यू झाला असून सीसीटीव्हीव्दारे वाहनाचा पत्ता मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करून वाहन ताब्यात घेतले आहे.

Recommended read: त्राला भेटायला गेलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, चौघे चौकशीसाठी ताब्यात

चोराळा गावाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार, एक बोलेरो वाहन हार्डवेअरची तार घेवून जात असतांना दिसली. पडोली पोलिसांनी चंद्रपूर शहर व पडोली संकुलातील हार्डवेअर दुकान मालकांना बोलावून याबाबत चौकशी केली असता, पठाणपुरा येथील हार्डवेअरमधून वाहनात वायर लोड करून बेलोरा मूलकडे निघाल्याचे सांगितले. चालकाला हा प्लॉट विकायचा असल्याने, त्या दिवशी एका ग्राहकाला चोराळा गावात असलेल्या सिद्धी ले-आऊटमध्ये प्लॉट पाहण्यासाठी घेऊन आला होता. ले-आऊट प्लॉटचा रस्ता लहान असल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेली तरुणी वाहनाच्या समोरील भागाला धडकली. त्यामुळे रक्तस्त्राव आणि अंतर्गत मार लागल्याने शासकीय रुग्णालयात नेत असताना मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मूल प्रभाग क्रमांक १५ मधील रहिवासी गणेश कवडू केतगळे याला निवासस्थानाहून अटक करून बोलेरो वाहन जप्त केले. आपल्या वाहनामुळेच हा अपघात झाल्याची कबुली आरोपी चालकाने दिली आहे. पडोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

One thought on “” त्या” तरूणीचा मृत्यू अपघातातच- पडोली पोलिस”
  1. […] नातेवाईकांचा पत्रपरिषदेत आरोप ” त्या” तरूणीचा मृत्यू अपघातातच मित्राला भेटायला गेलेल्या तरुणीचा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!