ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्तसंचार दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तुमडीमेंढा गावाजवळ पट्टेदार वाघ डौलात ब्रम्हपुरी-नागभिड मार्ग पार करीत असल्याचा थरार अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला. यावेळी मार्गाच्या दोन्ही बाजूने आपली वाहने थांबवून प्रवाशांनी वाघाचे दर्शन घेतले.

Recmmanded Read – एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

मात्र, ऐनशेती हंगामात वाघाचा वावर दिसत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
हा वाघ उमरेड जवळील कर्‍हांडला जंगलातून आला असल्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त होत आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी जनतेची मागणी आहे.

One thought on “ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार, अनेकांना झाले वाघाचे प्रत्यक्ष दर्शन”
  1. […] पोलिसांना मिळाला फक्त सांगाळा ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर वाघा… एटीएम फोडणाऱ्या तीन चोरट्यांना अटक […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!