पोराच्या दारूच्या व्यसन ला कंटाळून बापाने केला खून

पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै.) येथील घटना

चंद्रपूर: पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै) येथील जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाचा दारूच्या व्यसन ला कंटाळून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. समीर कन्नाके (२०) असे मृतक मुलाचे नाव असून घरगुती वादातून हा रक्तसंहार घडला आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Recommended read: चंद्रपुरातील शाळकरी मुलाने रचला स्वत:च्याच अपहरण चा बनाव

पोंभूर्णा तालुक्यातील मोहाडा (रै.) येथील बंडू शिवराम कन्नाके याचे आपला मुलगा समीर कन्नाके यांचे सोबत मुलगा दारूच्या व्यसन चा आहारी गेल्यामुळे पटत नव्हते. बापाचे व मुलाचे रोज भांडण होत होते.

दीड महिण्यापुर्वी मृतक समीरने आपल्या बापाला बेदम मारहाण केली होती. यात वडिल गंभीर जखमी झाला होता. व त्याला नागपूर येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले होते. तो काही दिवसांपूर्वीच मोहाडा येथे आला होता.

मुलाचे झालेल्या भांडणामुळे पटत नसल्यामुळे तीन दिवसांपासून तो आपल्या शेतातील झोपडीत पत्नी व मुलीसोबत राहत होता. मृतक समीर हा गावातील घरात एकटाच राहत होता.

घटनेच्या दिवशी मृतक समीर हा शेताकडे गेला. त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात जन्मदात्या बापाने पोटच्या मुलाला बंडिच्या उभारीने डोक्यात वार केला. यात समीर जागीच ठार झाला.

Recommended read: १० हजारांची लाच घेतांना खाजगी इसमासह कृषी सहाय्यकास अटक

घटनेची माहिती मिळताच पोंभुर्ण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!