इलेक्ट्रीक दुचाकी ने घेतला पेटदुचाकी जळून खाक

चंद्रपूर: येथील जयंत टॉकीज परिसरात असलेल्या फेअरडील या दुकानाच्या व्यवस्थापकाच्य मालकीच्या इलेक्ट्रीक दुचाकीने अचानक पेट घेतल्याने झी सेल परिसरात मोठा भडका उडाला होता. या आगीच दुचाकी पूर्ण:त जळून खाक झाली आहे.

Recommended read: बर्थडे कँडल चा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी

वेळीच अग्नीशमन यंत्राने आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे विद्युत दुचाकी धारकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओ लिंक

जयंत टॉकीज परिसरात अजय गिडवाणी यांचे फेअरडील नावाने इलेक्ट्रीकल दुकान आहे. त्यांच्याकडे इलेक्ट्रीक दुचाकी आहे. ही दुचाकी चार्जिगला लावली असतांना अचानक दुचाकीने अचानक पेट घेतला. पाहता पाहता आगीचा भडका उसळला होता. या आगीत विद्युत दुचाकी पूर्ण:त जळून खाक झाली आहे.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठाची प्रथमच QR कोड असलेली गुण पत्रिका

गिडवाणी यांच्या सर्तकतेमुळे अग्निशमन यंत्रांव्दारे आग विझविण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्युत दुचाकी धारकांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!