राज्यातील सर्वात वयोवृद्ध ' वाघडोह ' वाघाचा मृत्यू- Wagdoh tiger died- IG Media Chandrapur News

वाघडोह हा १७ वर्ष वयाचा राज्यातील एकमेव वाघ

चंद्रपूर: चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. हा वाघ ‘ वाघडोह ‘ नावाने प्रसिद्ध होता.

Recommended read: कळमना येथील पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग

वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता.

Recommended read: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत ४ हजार ९१८ वन्यप्राण्यांची नोंद

२१ मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता. तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघडोह नामक वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

3 thoughts on “राज्यातील सर्वात वयोवृद्ध ‘ वाघडोह ‘ वाघाचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!