चंद्रपूर : शहरातील बाजार वार्ड येथील भाजी मंडीच्या इमारतीमध्ये ट्रॅक्टर मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. दुर्योधन सुधाकर क्षिरसागर (३६) रा. शिवाजीनगर असे मृतकाचे नाव आहे.

recommended read: https://igmedias.com/agitations-in-chandrapur-against-agneepath-yojana/

सोमवारी पहाटे दरम्यान नागरिकांना दुर्गंधी येत होती. ती कुठून येत आहे, हे बघण्यासाठी नागरिक गेले असता बंद असलेल्या भाजीमंडीच्या पहिल्या माळ्यावर कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याने हा घातपात तर नाही ना या दिशेने प्राथमिक तपास पोलिसांनी सुरु केला.

दरम्यान मृतकांच्या पत्नीला विचारणा केली असता तिने दुर्योधन हा ट्रॅक्टर मजूर असून मद्य प्राशन करीत होता. कधीकधी दोन ते तीन दिवस घरी येत नव्हता, अशी माहिती दिली. यावरून दुर्योधनचा मृत्यू अति मद्यप्राषनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणेदार गोपाल भारती यांनी वर्तविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!