नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील घटना

चंद्रपूर: नागभीड वरून ब्रम्हपुरीकडे जाणारा एका टिप्पर दुचाकीचा जबर धडक दिल्याने भीषण अपघात होवून दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागभीड रेल्वे फाटकाजवळ घडली.

अपघातात चिखल परसोडी येथील भुषण शामराव बोकडे (२१), पवन विनोद बोकडे (१५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गिरीश सुधाकर बोकडे (१६) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

Recommended read: जिल्ह्यात कोळसा माफिया सुसाट

मृतक भूषण बोकडे हा नागभीड येथील किराणा दुकानात काम करत होता. शनिवारी सायंकाळी घरी चुलत भावाचे लग्न असल्याने तो दुकानात आला नव्हता. मात्र, आपल्या चुलत भावंडासोबत काही कामानिमित्त नागभीड येथे दुचाकीने येत असताना हा भीषण अपघात झाला. मृतक आणि जखमी हे सर्वसामान्य कुटुंबातील असून, आई-वडील हे मजुरीचे काम करतात. मृतक भूषण बोकडे याला आई, वडील, एक भाऊ व एक बहीण आहे. तर पवन बोकडे याला आई, वडील व एक बहीण आहे.

Recommended read: ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात ८ मे ला बैठक

या घटनेने बोकडे कुटुंबावर आणि गाववासियांवर फार मोठे दुःख कोसळले आहे. दरम्यान, शनिवारी गावात असलेले सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच स्वागत समारंभाचा कार्यक्रम संदोकर कुटुंबाने रद्द केलेला आहे. या घटनेचा तपास नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजू मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!