डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात -IG Media Chandrapur News

अपघातानंतर डिझेल टँकर व ट्रकनी घेतला भडका

नऊ जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूर-मूल मार्गावर डिझेल टँकर व लाकूड भरलेला ट्रकची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागल्याने या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

Recommended read: अनियंत्रित कार उलटल्याने एक ठार, चार जखमी

गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूरला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रकने चंद्रपूरहून मुल कडे जाणारा डीझल टँकर वाहनाला समोरासमोर जोरदार धडक दिली असता, दोन्ही वाहनाने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आले.

Recommended read: बाबुपेठ येथील डॉ. शरयु पाझारे यांच्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर मनपातर्फे कारवाई

लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक अजय सुधाकर डोंगरे (३०), प्रशांत मनोहर नगराळे (३३), मंगेश प्रल्हाद टिपले (३०), महिपाल परचाके (२५), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (४६), साईनाथ बापूजी कोडापे (४०), संदीप रवींद्र आत्राम (२२) रा. तोहोगाव हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. यांचा मृत्यू झाला आहे. तर डीझल टँकर मधील वाहनचालक हनिफ खान (३५) रा. अमरावती, कंडक्टर अजय पाटील (३५) वर्धा दोघेही ट्रक मध्ये होरपळून मृत पावले.

2 thoughts on “डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात”
  1. […] ‘रानबाजार’ ( Ran Bazar ) चा ट्रेलर रिलीज डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात अनियंत्रित कार उलटल्याने एक ठार, […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!