दुर्गापूर हत्याकांड प्रकरणी दहा आरोपींना अटक

दुर्गापूर हत्याकांड : पोलिसांनी पाठलाग करून आरंभ टोलनाक्यावर केली अटक

स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांची कारवाई

चंद्रपूर: दुर्गापूर हत्याकांड :चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळील नायरा पेट्रोल पंपजवळ दहा जणांचा गटाने एका युवकांची धारदार शस्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (३२) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

Recommended read: वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात का वाढतो आहे मानव-वन्यजीव संघर्ष?

या घटनेने एकच परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत पळून जात असतांना दहा आरोपींना अटक केली आहे.विज निर्मिती केंद्राच्या मेजरगेट परिसरात ८-१० जणांनी मिळून आरोपीने शीर कापून हत्या केली. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव तयार झाला होता. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह लगेच घटनास्थळावरून हलविला.

दुर्गापूर परिसर हा गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाने काही दिवसांपूर्वी एकाला मारहाण केली होती. यातूनच त्यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

Recommended read: बिबट पडला विहीरीत

घटनास्थळाजवळ इमली बियर बार असून या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला अज्ञात ८ ते १० आरोपींनी मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आहे.

रात्री १२.२० वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत घटनेचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलिसांना आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.

Recommended read: भररस्त्यात हत्येचा थरार

अतुल मालाजी अलीवार (२२), दिपक नरेंद्र खोब्रागडे (१८), सिध्दार्थ आदेश बन्सोड (२१), संदेश सुरेन्द्र चोखांन्द्रे (१९), सूरज दिलीप शहारे (१९), साहेबराव उत्तम मलिये (४५), अजय नानाजी दुपारे (२४), प्रमोद रामलाल सूर्यवंशी (४२) या आठ आरोपींना वर्धा जिल्ह्यात चारचाकी वाहनाने पळून जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून आरंभ टोल नाका येथून अटक केली आहे. तर दुर्गापूर पाेलिसांनी शुभम मलिये (२०), भागिरथी ठाकूर (३२) या दोघांना चंद्रपूरमधून अटक केली आहे. आरोपींची संख्या १० वर पोहोचली असून अधिक तपास पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!