कर्तव्यापलिकडे जावून कार्य केल्याने तहसीलदार व ठाणेदार अनेकांसाठी प्रेरणादायी

चंद्रपूर: आपातकालीन परिस्थितीत एकाही रूग्णांचा उपचाराअभावी जीव जावू नये यासाठी गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी.मेश्राम व कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण या संवेदनशिल अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे गोंडपिपरी तालुक्यात कौतुक होत आहे. अधिकाऱ्यांच्या संवेदनशिलतेमुळे १७ वषी्रय मुलांचा जीव वाचला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यापलिकडे जावून कार्य केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सिध्द करून दाखविले आहे.

Recommended read: ताडोबा लगतच्या अलिझंजा जंगलात वाघाच्या हल्यात गुरखा ठार

मुसळधार पाऊसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव या गावाला चारही बाजूने पूराने वेढले असून बेटाचे स्वरूप आहे. अशातच तोहोगावातील साहील वाघाडे या १७ वर्षीय मुलाला मेंदूज्वर झाला. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

गावाच्या चहूबाजूने पाणीच पाणी आता जायचं कस हा मोठा प्रश्न वाघाडे कुटूंबियांसमाेर होता. अशावेळी गावातील संवेदनशिल माणसे धाऊन आली. आणि घटनेची माहिती तहसिलदार के. डी. मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच ते अँक्शन मोडवर आहे.

तहसिलदार मेश्राम यांनी रूग्णवाहिका घेत जंगलातील कन्हाळगाव मार्गे तोहोगाव परिसरात गाठण्याचे ठरविले. घनदाट जंगलात भलेमोठ्ठे झाड आडवे पडून असल्याने वाहन पुढे जाऊ शकले नाही. मुलाची तब्ब्बेत बिघडत असल्यान कुटु़ंबियाची चिंता वाढली. अशा गंभीर अवस्थेत कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण पुढे येवून त्यांनी नावेच्या मदतीन गाव गाठला. अन रूग्णाला घेऊन ते चार नंबर जंगलात उभ्या असलेल्या रूग्णवाहिकेपर्यंत घेवून आले आणि साहिलाला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठ : विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ला सुरुवात

पुरामुळे गोंडपिपरी तालुक्याचे बेहाल झाले आहे. अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थिती तहसिलदार मेश्राम व ठाणेदार चव्हाण यांनी कर्तव्यापलिकडे कार्य केल्याने सर्वासाठी प्रेरणादायी आहे. प्रशासनात असे संवेदनशिल अधिकारी असल्यास एकाही रूग्णाचा उपचाराअभावी जीव जाणार याची खात्री आहे. वाघाडे कुटूंबियांनी तालुका प्रशासनाने आभार मानले आहे.

2 thoughts on “त्या रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदार व ठाणेदार बनले देवदूत”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!