धक्कादायक: शिक्षकांचा सात विद्यार्थिनींवर अत्याचार

शिक्षकी पेशाला काळीमा

विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अटक

चंद्रपूर: शिक्षकाने पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून वर्षभरापासून अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार करीत असल्याची घटना जिवती तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेला आहे. याप्रकरणी नराधम शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड (४९) याला जिवती पोलिसांनी अटक केली आहे.

Recommended read: शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रास ला भीषण आग

जिवती तालुक्यातील एका गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जि.प.शाळेत आरोपी नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींना कार्यालयात आळीपाळीने बोलवायचा. त्यानंतर अश्लिल चाळे करुन अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरु असून एका मुलीने आईला ही घटना सांगितल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी शिक्षकाने सात विद्यार्थिनींसोबत असा घृणास्पद प्रकार केला असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.

One thought on “धक्कादायक: शिक्षकांचा सात विद्यार्थिनींवर अत्याचार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!